Ad will apear here
Next
‘शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अचलपूर येथे होणे अत्यंत आवश्यक’
प्रातिनिधिक फोटोपरतवाडा (अमरावती) :  मेळघाटातील चिखलदरा, धारणी, अंजनगाव सुर्जी, दर्यापूर, चांदूरबाजार तालुक्यातील रुग्णांना आरोग्यसेवा वेळेवर मिळत नसल्याने अमरावतीसारख्या शहराकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे अचलपूर येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय निर्माण होणे अत्यंत आवश्यक आहे. 

अमरावती जिल्ह्यातील १४ तालुक्यातील सर्वाधिक रुग्णांची समस्या मेळघाटसह दर्यापूर, अजनगाव, अचलपूर, चांदुरबाजार या तालुक्यामध्ये आहे. अचलपूर उपजिल्हा रुग्णालय अस्तित्वात असूनसुद्धा सुविधा मिळत नाही. त्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय चारही तालुक्यांना मध्यवर्ती ठरणाऱ्या परतवाडा-अचलपूर शहरात होणे अधिक उपयुक्त ठरू शकते. मेळघाटात दर वर्षी मातामृत्यू व बालमृत्यूचे मोठे असून, अपघाताचे प्रमाणही मोठे आहे. तत्काळ उपचार न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो.

अंजनगाव, अचलपूर, चिखलदरा, धारणी, चांदूरबाजार या तालुक्यासाठी परतवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाची जागा उपलब्ध असून, शासनाने पुढाकार घेतल्यास वैद्यकीय महाविद्यालयातील मोठी अडचण दूर होऊ शकते. 

अमरावती शहरातील काही नेत्यांनी एकत्रित येऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अमरावतीत निर्माण व्हावे याकरीता कृती समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी अमरावती शहराऐवजी हे वैद्यकीय महाविद्यालय जिल्ह्यातील होणे अत्यंत आवश्यक आहे. अमरावती शहरात डॉ. पंजाबराव देशमुख महाविद्यालय, सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, जिल्हा सामान्य रुग्णालय, तसेच अनेक खासगी रुग्णालये आहेत. 

अमरावतीच्या कृती समितीच्या सदस्यांसह अचलपूर, अंजनगाव, चिखलदरा, धारणी, दर्यापूर येथील सर्वच पक्षीय राजकीय नेत्यांनी हे वैद्यकीय महाविद्यालय अमरावती शहराऐवजी ग्रामीण भागातील अचलपूर उपविभागात करण्यासाठी पुढाकार घेतल्यास खऱ्या अर्थाने या भागासाठी ही आरोग्य सेवा निश्चितच उपयुक्त ठरू शकते, असे तज्ज्ञांचे आणि नागरिकांचे म्हणणे आहे.
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/MZTSBE
Similar Posts
अचलपूर येथे नागपंचमी उत्साहात परतवाडा (जि. अमरावती) : अचलपूर येथील बुंदेलपूर येथे नागपंचमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. परिसरातील नागरिकांनी एकत्र येऊन नागमंदिरात पूजा करून विविध धार्मिक कार्यक्रम केले. या निमित्ताने मंदिरासमोर भव्य फुलोरा लटकवण्यात आला होता. ज्या व्यक्तीने उंच उडी मारून या फुलोऱ्याला स्पर्श केला, तिला विशेष सन्मान दिला गेला
अमरावतीची सैर ‘करू या देशाटन’ या सदराच्या आजच्या भागात आपण विदर्भातील अमरावती आणि आसपासच्या प्रदेशातील निसर्गरम्य, तसेच ऐतिहासिक ठिकाणी फेरफटका मारू या.
शेतकरी स्वयंपूर्ण व्हावा यासाठी शासन प्रयत्नशील पालकमंत्री प्रवीण पोटे पाटील यांच्या हस्ते स्वातंत्र्यदिनानिमित्त आयोजित केलेला मुख्य शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात झाला.
शेतकरी उभे करणार बिगरराजकीय आंदोलन शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी प्रकाश पोहोरे, विजय जावंधिया, देवेंद्र शर्मा यांनी जेलभरो आंदोलन करायचे ठरविले आहे. शेतकऱ्यांना न्याय मिळावा या हेतूने हे बिगरराजकीय आंदोलन उभे करण्यात आले आहे. ‘बिगरराजकीय आंदोलन उभे झाले, तर सरकारदेखील सहानुभूतीने विचार करू शकते. शेतकऱ्यांनी

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language